uldhana Farmers Protest : पेणटाकळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी प्रकल्पात घेतल्या उड्या, जलसमाधी घेण्याचा दिला इशारा

uldhana Farmers Protest : पेणटाकळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे अडीच कोटी रुपये न मिळाल्यामुळे आज प्रकल्पातच उड्या घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांचं म्हणणं एकून घेण्यासाठी कोणताही अधिकारी प्रल्पस्थळी आला नाही. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून नुकसानभरपाईची रक्कम तातडीने मिळाली नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी  प्रकल्पातून जाणारा कालवा दोन वर्षांपूर्वी फुटला होता आणि यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूने असलेल्या हजारो हेक्टर शेती खरडून गेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झालं होतं अनेक फळबागाही वाहून गेल्या होत्या. त्यावेळी पंचनामे झाले नुकसान, भरपाई म्हणून या शेतकऱ्यांना अडीच कोटी रुपये मंजूरही झाले. मात्र दोन वर्ष झाले तरी संबंधित विभागाने या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसानभरपाईचे रक्कम दिलेली नाही.

Lok Sabha Security Breach : संसदेची सुरक्षा ठेवता येईना, देशाची सुरक्षा कशी करणार; शरद पवार गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान आजही शेतकऱ्यांनी ही मागणी लावून धरली. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या संतप्त शेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्पात उड्या घेत संताप व्यक्त केला. मात्र संबंधित यंत्रणेचा कोणताही अधिकारी यावेळी हजर नसल्याने शेतकरी अधिकच आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेही अनेक कार्यकर्ते सामील झाले आहेत. सध्या हे शेतकरी प्रकल्पातील खोल पाण्यात उतरले आहेत. तसेच सरकारने तातडीने याची दखल घेतली नाही तर जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply