Uddhav Thackeray : राजकारणी म्हणून इर्शाळवाडीची घटना सर्वांसाठीच लाजिरवाणी, दुर्घटनाग्रस्तांचं सांत्वन केल्यानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त इर्शाळवाडी येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मदत कार्याचा आढावा देखील घेतला.

या घटनेचा आढावा घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. ते म्हणाले, मी देखील राजकारणी आहे. परंतु इर्शाळवाडीची ही घटना राजकारणी म्हणून सर्वांसाठीच लाजिरवाणी गोष्ट आहे. आज अशा अनेक वसत्या आहेत, ज्या डोंगराच्या पायथ्याशी आहेत आणि तिथे दरड कोसळ्याची भीती आहे. या वसत्यांचे वेळी स्थलांतर व्हायला हवं.

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले, मी या लोकांना भेटलो, पण त्यांना भेटून सांगू तरी काय. अशा घटना टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्र येऊन याबाबत काम करायला हवं. देशाच्या स्वांत्र्याला 75 वर्षे होऊनही आज अदिवासी, प्रकल्पग्रस्तांना असं जिवन जगावं लागतंय. यासाठी इर्शाळावाडीच नाही, तर अजुबाजुच्या काही वस्त्यांशी बोलून मी व्यवस्था निर्माण करण्याविषयी बोलणार आहे.

Ratnagiri Rain Update : रत्नागिरीत २१ ते २५ जुलै दरम्यान मुसळधार पाऊस भारतीय हवामान खात्याचा इशारा; शाळांना सुट्टी

उद्धव ठाकरे म्हणाले, अशा धोकादायक वसत्यांसाठी एखादी योजना तयार करण्याची गरज आहे. सरकार कोणतंही असो ती योजना सुरु राहायला हवी. आपण राजकारणी म्हणून त्यांच्याकडे मतदान मागायला जातो, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा धोकादायक वसत्यांच्या तेथील नागरिकांशी चर्चा करून स्थलांतर करायला हवं आणि तीन चार वसत्या मिळून एखादं गाव वसवलं जाऊ शकतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, मी मदतकार्याचा आणि येथील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. परंतु घटनास्थळी जाणं मी टाळणार आहे. कारण मी गेलो तर काही लोक माझ्यासोबत येतील आणि त्यामुळे मदतकार्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होईल असं कुठलंही काम मी करणार नाही. दुर्घटनाग्रस्त लोकांना कंटेनरमध्ये ठेवण्यापेक्षा जिथे उदारनिर्वाहचे साधन आहेत तिथे हे कंटेनर ठेवायाल हवे असे देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply