Uddhav Thackeray News : 'भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडा..' शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे- राऊतांची तोफ धडाडली!

Uddhav Thackeray News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण- डोंबिवली मतदार संघाचा आज उद्धव ठाकरेंनी दौरा केला. यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेच्या शाखांचे उद्घाटन झाले. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांनीही शिंदे पिता- पुत्रांवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"सर्व देशभक्त एकत्र झालेत सर्व पक्ष आज एकत्र आलेत. आपलं हिंदुत्व बेंगडी नाही आपण हिंदुत्व सोडू शकत नाही. राम मंदिर विषय थंड बसला होता. मी राम मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा निकाल लागला, असे उद्धव ठाकरे  यावेळी म्हणाले. देशाच्या धार्मिक सोहळा आहे तेव्हा राष्ट्रपतींना बोलवायला हवं, मात्र हे शंकराचाऱ्यांनाही ही बोलवत नाहीत.." अशी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली.

Nagpur News : विधानसभा अध्यक्षांविरोधातील आंदोलन भोवलं; ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 10 जणांना अटक

"तुम्ही माझं चोरलेलं धनुष्य बाण घेऊन उभे राहा आम्ही मशाल घेतो होऊन जाऊदे, असे आव्हानही ठाकरेंनी यावेळी दिले. तसेच कल्याण-डोबिंवली लोकसभा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

संजय राऊतांची फटकेबाजी..

"आजचे स्वागत बघून टेंम्भी नाक्याच्या बाहेर मिरच्या लागल्यात, आम्ही अजून मिरच्या घालणार आहोत. आदी या गद्दारीची घराणेशाही संपवा. आज मुख्यमंत्र्यांना काही काम राहील नाही, आज कचरा काढताहेत त्यांचा कचरा आपण साफ करू.. अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच बाळासाहेबांची शिवसेनेला हाथ लावायची कोणाची हिम्मत नाही, शिवसेना साहेबांसोबतच राहणार," असेही राऊत म्हणाले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *