Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लोकसभेच्या सर्व ४८ जागांचा आढावा घेणार, उद्यापासून बैठकांचा धडाका

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सर्व 48 जागांचा आढावा घेणार आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघनिहाय उद्यापासून बैठकांचा धडाका सुरु होणार आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रमावस्था असताना काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून आपापल्या पक्षाच्या उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र सुरु होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा 18 ऑगस्टला आढावा घेतला जाणार आहे. लोकसभानिहाय मतदारसंघाच्या बैठकीला त्या त्या मतदारसंघातील संपर्क नेते, स्थानिक उपनेते, जिल्हासंपर्कप्रमुख, स्थानिक विभागीय महिला संघ, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख शहरप्रमुख (प्रमुख शहरातील), विधानसभाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख (मुंबई) उपस्थित राहणार आहेत.

Thane Kalwa Hospital : कळवा रुग्णालयात 3 दिवसांत 27 जण दगावले, 25 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मतदार संघाच्या बैठकांचा वेळापत्रक

16 ऑगस्ट

  • दुपारी 12.30 वाजता - नंदुरबार

  • दुपारी 1.30 वाजता- धुळे

  • दुपारी 4.30 वाजता - जळगाव

  • दुपारी 5.30 वाजता - रावेर

17 ऑगस्ट

  • दुपारी 12.30 वाजता - अहमदनगर

  • दुपारी 4.30 वाजता - नाशिक

  • दुपारी 5.30 वाजता - दिंडोरी



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply