Uddhav Thackeray : आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा; राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांसाठी घेतला मोठा निर्णय

Uddhav thackeray : अजित पवार आणि समर्थकांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात राजकीय भूंकप घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यात संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी राज्याचा दौरा करणार आहे.

आज ठाकरे गटाची मातोश्रीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे विविध शहरांमध्ये जाऊन संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच या बैठकीत सध्याच्या बदललेल्या राजकीय स्थितीला कशा प्रकारे सामोरे जायचं, यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे.

या बैठकीत समान नागरी कायद्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. बाळासाहेबांची समर्थनार्थ भूमिका होती, यामुळे, ठाकरे गट कायद्याचा मसुदा काय आहे, हे पाहून भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

मातोश्रीत झालेल्या बैठकीत नेमक्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावर भाष्य करताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, 'उद्धव साहेबांनी दौरा करावा, अशा प्रकारचा आग्रह करण्यापेक्षा उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक महिने मला महाराष्ट्रामध्ये फिरायचं आहे असं सातत्याने सांगत आहेत. परंतु मध्यंतरी पाऊसच नव्हता, आता पाऊस बऱ्यापैकी झालेला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर लवकरच बाहेर पडतील'.

उद्धव ठाकरे 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार का, यावर भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, 'या प्रकारचा कोणताही विचार आणि अशी चर्चा बैठकीत कोणी केलले नाही. आमच्या महाविकास आघाडीत फूट पाडण्याकरिता भाजपकडून अफवा पसरवल्या जात आहेत'.

Maharashtra Politics : शरद पवारांचं शक्तीप्रदर्शन, पक्षासाठी बाप-बेटे मैदानात; जयंत पाटील मुंबईत तर प्रतीक पाटील कराडमध्ये

राष्ट्रावादीच्या फूटीनंतर महाविकास आघाडी सज्ज

राष्ट्रवादीतील फूटीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करणासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. राज्यातील राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिळून करणार महाराष्ट्राचा दौरा करणार आहे.

महाविकास आघाडीचे नेते उत्तर महाराष्ट्रातून दौऱ्याला लवकरच सुरूवात करणार आहे. लोकशाही विरोधी भाजपला राज्यातून उखडून टाकणार, अशी आक्रमक पवित्रा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply