Uddhav Thackeray : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, 'बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर एका बसला भीषण अपघात होऊन त्यात 26 जणांचा दुर्दैवी अंत झाला. हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आता पर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले'.

'सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करीत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.शरद पवार यांनी ट्विट करत बुलढाण्यातील  मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. शरद पवार म्हणाले,

'बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना'.

'या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, असे शरद पवार म्हणाले

Uttar Pradesh Accident : ह्रदयद्रावक! मुलाला साप चावल्याने रुग्णालयात निघाले.. रस्त्यात झाला भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू

सरकारकडून मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसचा अपघात झाला. आतापर्यंत अपघातात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील जखमी प्रवाशांना बुलढाणा येथील सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply