Uddhav Thackeray : उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय...' उदय सामंतांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी; नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray : ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका सध्या कोकणामध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा राजापूरमध्ये पोहोचला असून दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज राजपुरमधील जवाहर चौकात उद्धव ठाकरे यांची सभा झाल्यानंतर रत्नागिरीमध्येही सभा पार पडली. या सभेत बोलताना ठाकरेंनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"राजनच्या मतदारसंघातून तुमच्या मतदारसंघात आलो. तुमची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकटात लाथ घालायला आलोय. उद्योगमंत्र्यांचे उद्योग आम्ही पाहतोय. आम्हाला शिवसेना शिकवतायेत. हे 2014 साली लाचारी करुन शिवसेनेत आले. मी मंत्री पदाचा शब्द उदय सामंत यांना दिला होता तो पाळला आणि उदय सामंत पळाले. बिनडोक माणसाचा करायचे काय?" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

Amey Khopkar : “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान; म्हणाले, “चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत…”

तसेच "आता राजन साळवी तुमच्याकडे मी जेवायला जातोय. त्यात काय काय मेजवानी आहे त्याची बातमी आली. आता जेवण झाल्यावर एवढा खर्च केला म्हणून ते अधिकारी परत तुमच्या कडे येतील, पण घाबरू नका राजन मी स्वतः तुमच्यासोबत आहे," अशी कोपरखळीही उद्धव ठाकरे यांनी लगावली.

भाजपवर निशाणा...

"भाजपला किती नाव लावू? बाहेरची जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी, भेकड जनता पार्टी अशी टीका करत गुजरातची चाकरी करणाऱ्या गद्दारांनो तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घ्यायचा अधिकार नाही. हिंदुत्वाच्या गप्पा मारु नका, मी हिंदुहृदयसम्राटांचा पुत्र आहे याचा अभिमान मला आहे," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply