Uddhav Thackeray : भाजपच्या किती कार्यकर्त्यांवर ईडीची कारवाई झाली? उद्धव ठाकरेंचा सवाल; भरत गोगावलेंवर साधला निशाणा

Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने ठाकरे गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा रायगडमध्ये जनसंवाद दौरा सुरू आहे. आज पोलादपूर येथे उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेतून त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"मी कालपासून इथं आहे मी काय काय केलं हे गिते साहेबांनी सांगितलं. कोरोना काळात मी माझ कुटुंब माझी जबाबदारीची घोषणा केली होती पण त्याने पण काहींना डोकेदुखी आहे. काहीजण दारात जातात, तेव्हा लोक म्हणतात अरे हड..." असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली.

Raj Thackeray : 'सत्ता कायम राहत नाही, सध्याचं राजकारण भाजपला परवडणार नाही', राज ठाकरेंचा हल्लाबोल

तसेच "रायगडने अनेकांना झुकवलं आहे, तानाजी मालुसरे यांची ही भूमी आहे. इथं झेंडा बाजूला आणि नॅपकिन पुढं पुढं. जॅकेट घेतली पण काहीही झालं नाही भावी पालकमंत्री म्हणूनच राहिले, " असे म्हणत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले  यांच्यावरही ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला.

"आम्ही गॅरंटी म्हणत नाही, आम्ही प्रामणिकपणे काम करतो. चौकशी करायची असेल तर मुंबई पालिकेची नको पीएम केअर फंडची करा. प्रफुल्ल पटेल तुमच्यासोबत आल्यावर त्यांच्यावरील कारवाईचे काय झाले. महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेले नेते मुग नव्हे खोके गिळून गप्प झालेत. आता आपल्याला सर्व थोतांडाना उत्तर द्यायची आहेत, माझा पक्ष चोरला आता माझ्या लोकांच्या मागे लागलेत, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply