Uddhav Thackeray : 'पापाचा घडा लपवण्यासाठी...'; 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त शिवसंकल्प मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं. या मेळाव्यादरम्यान माजी उपमहापौर राजू शिंदे आणि त्यांच्यासह ६ माजी नगरसेवकांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आखपाखड केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरूनही राज्य सरकारवर कडाडून टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, 'काल तुम्ही जिंकला असला तरी मी विधानसभेत छत्रपती संभाजीनगर जिंकणार आहे. ते ४०० पार करणारे होते. राज्यात त्यांना ९ वर आणलं. माझ्या हक्काचा खासदारसंभाजीनगरमध्ये नाही. या छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी भगव्याची बीजे रोवली. त्यांनी संपूर्ण मराठवाडा पादक्रांत केला. हक्काची छत्रपती संभाजीनगरची जागा गमवावी लागली. आपला उमेदवार कित्येक वर्षे शिवसेना एके शिवसेनेत राहिले.

Pune News : सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या वसतिगृहात आग

हार जीत होत असते. निवडणुकीत हारलो तरी आयुष्य संपत नाही. लढण्याची हिंमत हरता कामा नये. तीन महिन्यानंतर विधानसभाची निवडणूक होती. आता कालची लढाई लोकशाही वाचवण्याची होती. संविधान वाचवण्याची लढाई होती. आता येणारी विधानसभा निवडणुकीची लढाई म्हणजे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्राचा साधू-संत, शिवप्रभूंचा आहे. मी लाचारीचा महाराष्ट्राचा होऊ देणार नाही.

बाळासाहेब ठाकरेंनी वीज बील माफीची मागणी केली. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वीज माफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकऱ्यांना शून्य रकमेची वीज बिले मिळाली. त्यानंतर शिवसेनेचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आले. त्यानंतर पुढे विलासराव देशमुख सत्तेत आले. त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना दामदुपटीने वीज बिले यायला लागली. आताही हेच चालू झालं. अनेक योजना पापाचा घडा लपवण्यासाठी योजनांचं पांघरून घालत आहे. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply