Uddhav Thackeray : सूरतेत एक जादू झाली अन् त्यांचा उमेदवार बिनविरोध आला; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

Uddhav Thackeray : सूरत लोकसभा मतदारसंघावरून राजकारण पेटलं आहे. सूरत लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा अर्ज अवैध ठरला. तर भाजप उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आल्याचं जाहीर करण्यात आलं. यावरून विरोधकांकडून टीका सुरू आहे. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे. 'सुरतेत एक जादू झाली आणि त्यांचा उमेदवार बिनविरोध निवडून आला, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.

उद्धव ठाकरे यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे म्हणाले, 'मला सभा घ्यायची होती, पण वेळेची खेचाखेची सुरू आहे. आज संध्याकाळी 5 वाजता प्रचार संपत आहे. त्यामुळे जाहीर सभा घेता येत नाहीये. मी वसंतराव चव्हाण यांना विनंती केली, आणि त्यांनी ती मान्य केली. मी माझ्या शिवसैनिकांना निवडणुकीच्या प्रचारात मदत करण्यास सांगितले आहे. माझे शिवसैनिक तुमच्या विजयासाठी काम करतील. २०१९ साली पहिल्यांदा महाविकास आघाडीचे सरकार आले'.

Manipur Violence: "भारतामध्ये सरकारकडूनच होतेय नवाधिकारांची हत्या," अमेरिकेच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक आरोप

'महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी केली. ज्या शिवसेनेने शेतकऱ्यांसाठी काम केले, त्यांचेच नाव सातबाऱ्यांवरून नाव काढले. शिवसेनेचा सातबारा दुसऱ्यांच्या नवावर केला. तुमच्याशी असे वागू शकतात तर आमचाही सातबारा कोरा करतील. सुरतमध्ये जादू झाली आणि भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply