Uddhav Thackeray : इतिहासाची पुनरावृत्ती! बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेंचं मातोश्रीबाहेर जिपमधून भाषण

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी आज इतिहासाची पुनरावृत्ती केली. यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा जिपवर उभा राहून लोकांशी संवाद साधला होता. त्यानंतर आता त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीबाहेर ओपन जिपमधून शिवसैनिकांशी संवाद साधला.

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर आज शिवसेनेच्या खासदार, आमदारांसह प्रमुख नेत्यांची मातोश्रीवर बैठक पार पडली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी कलानगर चौकात शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, एक काळ होता मोदींचे मुखवटे घालून लोक सभेला जात होती, आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मतदान मागावं लागत आहे. (

कपटी राजकारण सुरू आहे. शिवसेना नाव चोराला दिलं गेलं, पवित्र धनुष्यबाण चोरांना दिलं, आता मशालही हे काढून घेतील. परंतु शिवसेना संपवता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. असे कितीही चोर आणि त्यांचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर भगवा फडकवण्याची ताकद शिवसैनिकांत आहे असे म्हणत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल गेला. 

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी कधी खचलो नव्हतो कधी कचणार नाही. या चोरांना धडा शिकवायचा आहे. हे शिवसैनिक त्यांना तो शिकवल्याशिवाय राहणार नाही. शिवधनुष्य पेलायला दाकद लागते. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता, काय झालं होतं? तुम्ही धनुष्यबाण घेऊन मैदानात या, मी मशाल घेऊन येतो असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply