Uddav Thackeray News : 'गद्दारीचा शिक्का सात पिढ्या जाणार नाही...' उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका; मोदींवरही साधला निशाणा

Uddav Thackeray News : 'शिवसेना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्यावतीने ज्येष्ठ शिवसैनिकांचं संमेलन आयोजित केलं होते. दादरमधील सावंतवाडी संस्थान सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जेष्ठ शिवसैनिकांशी संवाद साधला. तसेच आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि केंद्र सरकारचाही शेलक्या शब्दात समाचार घेतला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जेष्ठ सैनिकांच्या संमेलन कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी "अडीच वर्ष भाजपचा आणि अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असे ठरले होते. मात्र एकनाथ खडसेंना पुढे करुन युती तोडण्यात आल्याचा पुनरुच्चार यावेळी केला.

Maratha Aarakshan : आरक्षणाची मागणी करत 2 तास घोषणाबाजी केली, नंतर पाण्याच्या टाकीवरुन मारली उडी, भयंकर घटना

तसेच "मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठीच शिवसेना फोडल्याचा घणाघातही ठाकरेंनी यावेळी केला. मुंबई तोडण्याचा डाव आता सुरू आहे. मात्र मुंबई काय आंदण म्हणून मिळाली नाही महाराष्ट्राला... लढा देऊन मुंबई जिंकली आहे. सध्या दोन जे बसलेत त्यांच्या पायाशी मुंबईतील सर्व घेऊन जात आहेत. परंतु मुंबई तोडणाऱ्यांचे तुकडे करू," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दारीचा शिका सात जन्म जाणार नाही...

या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावरही सडकून टीका केली. "सत्तेत बसलेल्यांना आपण काय करतोय तेच कळत नाही. त्यांचा फक्त वापर केला जात आहे. आपल्या आईशी गद्दारी करत आहेत, असे म्हणत त्यांच्या कपाळावर बसलेला गद्दारीचा शिक्का सात पिढ्या पुसला जाणार नाही.." अशी जहरी टीकाही ठाकरेंनी यावेळी केली.

कोरोना काळातील कामाचा उल्लेख...

"कोरोना काळात आम्ही काय केले. मुंबई पालिकेने काय केले? लोकांना विचारा असेही उध्दव ठाकरे म्हणाले. कोविड काळात एकाचाही ऑक्सिजनविना मृत्यू झाला नाही. एकाही मृतदेहाची विटंबना झाली नाही. मजुरांना आपण एसटीने त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडलं, असे म्हणत दिल्लीलादेखील आपली भिती आहे, म्हणूनच आपल्या नावाच जप करतात..." असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply