Udayanraje Bhosale News : शिवप्रेमींनाे ! प्रतापगड भेट सुखावह होणार : उदयनराजे भाेसले

Udayanraje Bhosale News : खंडेनवमीला प्रतापगडावर खासदार उदयनराजे भाेसले यांच्या हस्ते श्री तुळजाभवानीचा अभिषेक सोहळा पार पडला. त्यावेळी खासदार  उदयनराजे यांनी गडाची पाहणी केली. त्यानंतर तेथील स्थानिकांशी चर्चा करुन गडाच्या विकासाबाबत ठाेस पावले उचलल्याचे नमूद केले.

आज खासदार उदयनराजे भाेसले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेतली. यावेळी प्रतापगडावरील प्रस्तावित कामे, पूर्णत्वास गेलेली कामे, मार्गी लागलेली कामे आणि काही नवीन कामांचा राजेंनी आढावा घेतला.

Sanjay Raut : रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शिवसेनेत राहणार होते, राहिले का? एकनाथ शिंदेंच्या शपथेवरुन राऊतांचा बोचरा वार

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, वीजवितरण विभाग, एसटी महामंडळ यांच्याकडे प्रलंबित असलेली प्रतापगडावरील बहुतांश कामे पूर्ण झाल्याचे अधिकारी यांनी नमूद केले. तसेच उर्वरित कामे मार्गी लागली असल्याचे सांगितले.

प्रतापगडावरील पाणीपुरवठ्याबरोबरच महाबळेश्वर ते प्रतापगड बससेवा सुरू करणे, दगडी पायऱ्या, तळ्यांचे संवर्धन, श्री भवानीमाता मंदिराभोवती फरशी आणि शेड, मंदिराच्या छताची गळती काढणे, मुख्य दरवाजा आणि अन्यत्र दिवाबत्ती तसेच जन्नित्र, भूमिगत जलवाहिनी, चौथरा, वाहनतळ, वाडा ते प्रतापगड रस्ता अशा सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत असे उदयनराजे नमूद केले.

ड्रीम प्रोजेक्ट

विशेष म्हणजे, गडावरील रोप-वेसाठी जिल्हाधिकारी आग्रही आहेत. धोम, पाचगणी,  महाबळेश्वर, प्रतापगड असा बृहत रोप-वे प्रस्तावित असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी याबाबत पूर्वीच बोलणे झाले आहे असेही राजेंनी म्हटले.

हा ड्रीम प्रोजेक्ट गडाच्या वैभवात मोलाची भर घालेल यात शंका नाही. पर्यटन विभागाच्या निधीतून लेसर शो आणि प्रशस्त बगीचाचे कामही मार्गी लागल्याचे राजेंनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply