Turkey Earthquake Update : तुर्कस्तान-सीरियात भूकंपामुळे हाहाकार; आतापर्यंत २३०० नागरिकांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

Turkey and Syria Earthquake : तुर्की आणि सीरिया सोमवारी पहाटे शतकातील सर्वात शक्तिशाली भूकंपाने अक्षरश: विनाश झाला आहे. या भूकंपात २३०० हून अधिक नागरिकांचा झोपेत असतानाच मृत्यू झाला आहे. या भूकंपात अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे. भूकंपाचे धक्के ग्रीनलँडपर्यंत जाणवले आहेत.

शक्तीशाली भूकंपामुळे तुर्की एका मोठ्या धक्क्याने हादरले आहे. आज सकाळी झालेल्या भूकंपामुळे येथे युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या भूकंपाच्या तीव्र धक्क्यामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. तुर्कीतील कहरामनमारा प्रांतातील एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसल्याचे सांगितले जात आहे.

या भूकंपाचे धक्के सायप्रस आणि इजिप्तपर्यंत जाणवले, त्यावरून हा भूकंप किती तीव्र होता याचा अंदाज येऊ शकतो. सीरियाच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राचे प्रमुख रायद अहमद यांनी सरकारी रेडिओला सांगितले की हा 'देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा भूकंप' होता.

बीएनओ न्यूजनुसार, सीरियामध्येही मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तान सरकारने सांगितलं की, भूकंपाचा देशातील 10 शहरांवर मोठा परिणाम झाला आहे.
स्थानिक वेळेनुसार पहाटे 4.17 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला आणि काही मिनिटांनंतर मध्य तुर्कस्तानमध्ये दुसरा हादरा जाणवला. तुर्कस्तानमध्ये झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिअॅक्टर स्केलवर 7.8 इतकी मोजली गेली. हा भूकंप दक्षिण तुर्कीमध्ये झाला. भूकंपानंतर तुर्कीने आंतरराष्ट्रीय मदतीचे आवाहन केले आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply