Tulajapur Drug Case : मोठी बातमी! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांचा सहभाग; १३ जणांची नावं समोर

Tulajapur Drug Case : तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वच्या सर्व १३ पुजाऱ्यांची नावं देखील समोर आली आहेत. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत ३५ आरोपी आहेत. यामधील २१ आरोपी फरार आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही. पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदेंनी ही माहिती दिली. तुळजापूर हे पुजाऱ्यांचं गाव आहे. इथे अनेक पुजारी आहेत. सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका, असं देखील विपीन शिंदे यांनी सांगितले.

Success Story : पोरानं बापाचे नाव मोठं केलं,फक्त २० व्या वर्षी पायलट झाला, अंबरनाथच्या लेकाची ठाण्यात चर्चा

तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याची नावे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणी तुळजाभवानी मंदिरातील १३ पुजारी सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजा यांनी पोलिसांनाकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावे आल्याने सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा. तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचे पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी सांगितले. दरम्यान ३ वर्षांपासून तुळजापूर इथे सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीविरोधात पुजारी मंडळाने पहिल्यांदा आवाज उठवल्याचा दावा देखील विपीन शिंदे यांनी आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply