Tourists Beaten in Nashik : धबधब्यावर मजा करायल गेले अन् सुजून आले, हुल्लडबाज पर्यटकांना सुरक्षारक्षकांची बेदम मारहाण

Nashik News : पावसाळा म्हटलं की पर्यटकांसाठी पर्वणीच असतं. पर्यटकांचे पाय आपोआप निसर्गरम्य ठिकाणी वळतात. मात्र पर्यटनस्थळी बेशिस्त पर्यटकांचीही कमी नसते. अशा हुल्लडबाजांमुळे पर्यटनस्थळी अनेकदा असुरक्षिततेची भावना इतर पर्यटकांना होते. मात्र नाशिकमध्ये अशा हुल्लबाजांना सुरक्षारक्षकांनी चांगलीच अद्दल घडवली आहे.

नाशिकमध्ये पर्यटनस्थळावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोरांना वनविभागाच्या सुरक्षारक्षकांनी चोप दिला आहे. त्र्यंबकेश्वर - घोटी मार्गावरील पहिणे गावातील काल दुपारी ४ वाजेची ही घटना आहे. नेकलेस धबधब्यावर काही पर्यटक धिंगाणा घालत हुल्लडबाजी करत होते. काही टवाळखोर याठिकाणी मद्यसेवनही करत होते अशी माहिती वन विभागाली मिळाली होती.

Sambahji Bhide Controversy : संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, समता परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्षांची घोषणा

त्यानंतर वनविभागाचे काही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि काही पर्यटकांना सुरु असलेल्या गैरप्रकारवरुन चांगलाच धडा शिकवला आहे. यावेळी वनविभागाच्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या लाठीहल्ल्याबाबत काही जणांनी जाबही विचारला. अशी मारहाण कशी करु शकता असा सवालही काहींनी विचारला. मात्र सुरु सुरक्षारक्षकांना काहीही न ऐकता हुल्लडबाजांना चांगलाच प्रसाद दिला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply