Titwala Crime : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, व्हिडीओ पोस्ट करत केले गंभीर आरोप

Titwala Crime : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून टिटवाळ्यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला होता. या व्हिडीओमध्ये तिने आपल्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या तिच्या प्रियकर आणि त्याच्या बहिणींची नावं घेतली आहेत. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळ्यात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणी सुमन मच्छिंद्र शेंडगेने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. प्रियकर सतत त्रास देत होता त्यामुळे सुमनने आत्महत्या केली. सुमन आणि सचिन शास्त्री यांचे गेल्या १० वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते. सचिव शास्त्रीने सुमनला 'तुझ्यासोबत लग्न करेन', असे आश्वासन देत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र त्याने ५ वर्षांपूर्वी गायत्रीसोबत लग्न केले.

IIT Baba News : भर कार्यक्रमात IIT बाबाला काठीनं झोडलं, पोलिसांनी नोंदवली नाही कंप्लेंट; लाईव्ह येत म्हणाला..

सुमनसोबत असलेल्या प्रेमप्रकरणाची माहिती सचिनची पत्नी गायत्रीला समजली आणि त्यानंतर सचिनच्या कुटुंबाकडून आणि सचिनकडून सुमनला त्रास देण्यास सुरूवात झाली. नेहमी सुमनला फोन करून सचिन आणि त्यांचे कुटुंब वारंवार त्रास देत होते. या त्रासामुळे सुमन मानसिकदृष्टया खचली होती.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply