Tirupati Stampede : तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशीच्या तिकीटांसाठी चेंगराचेंगरी; महिलेसह चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

Tirupati  : तिरुपतीमध्ये वैकुंठ एकादशी उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या टोकन काउंटरवर बुधवारी रात्री चेंगराचेंगरीची घटना घडली. तामिळनाडूतील सालेम येथील एका महिलेसह चार भाविकांना यामध्ये जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

श्रीनिवासम, बैरागीपट्टेडा रामनायडू स्कूल आणि सत्यनारायणपुरम या तीन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळते आहे. श्रीनिवासमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेक जण बेशुद्ध झाले तर जखमी भाविकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

Pune : ‘एचएमपीव्ही’च्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका दक्ष; आठ रुग्णालयांमध्ये व्यवस्था

ही घटना अनेक टोकन वाटप केंद्रांवर घडली, जिथं 10 ते 19 जानेवारी दरम्यान होणाऱ्या भगवान व्यंकटेश्वराच्या वैकुंठ द्वारम दर्शनासाठी हजारो भाविकांनी आपल्याला प्रवेश मिळावा यासाठी टोकन घेण्यासाठी गर्दी केली होती. काउंटर पहाटे 5 वाजता उघडणार होतं, तरीही भाविकांनी अदल्या दिवशीच्या संध्याकाळपासूनच रांगा लावायला सुरुवात केली, त्यामुळं इथं प्रचंड गर्दी झाली.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी व्यक्त केला शोक

मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या चेंगराचेंगरीच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या (सीएमओ) निवेदनानुसार, नायडू यांनी अधिकाऱ्यांशी फोनवर बोलून जखमींच्या प्रकृती अन् उपचारांचं मूल्यांकन केलं. मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी धाव घेण्याचे निर्देश दिले आणि जखमींना तातडीनं योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत तसंच यासाठी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

भाविकांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता तिरुमला तिरुपती देवस्थानमनं तीन दिवसांत (10-12 जानेवारी) आठ ठिकाणी टोकन वितरणाची घोषणा केली होती. यासाठी देवस्थानचे गस्त कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांची उपस्थिती असूनही, मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावल्यानं गर्दीवर नियंत्रण ठेवणं कठीण झालं, असं सांगितलं जात आहे. पण यामध्ये व्यवस्थापन योग्य प्रकारे केलं गेलं नसल्याचं दिसून आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply