खंडाळ्यात पुन्हा धावती मोटार जळून खाक ; पुणे-मुंबई द्रुतगती, महामार्गावर मोटार पेटण्याचे सत्र

पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा शवागरासमोर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुन्हा एक धावती मोटार जळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. धावती मोटार पेटून ती काही वेळात खाक होण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत पुणे-मुंबई महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर सातत्याने होत आहेत.

खंडाळा येथील आयसीआयसीआय ट्रेनिंग सेंटरसमोर गेल्या महिन्यात याच कंपनीची लोणावळ्यातील एक मोटार जळून खाक झाली होती. त्यापूर्वी नाझर काॅर्नर व खंडाळा बोगदा भागात आणि घाटातही संबंधित कंपनीच्या मोटारी जळून खाक झाल्या आहेत. गुरुवारी एक लाल रंगाची मोटार (क्र. एमएच ०४, जीजे ०३५३) लोणावळ्याच्या दिशेने येत असताना मोटारीने अचानक पेट घेतला. काही क्षणातच मोटार पूर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने आग लागल्याचे समजताच मोटारीत असलेले पाच जण बाहेर निघाल्याने मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती समजताच आयआरबी अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग पूर्णपणे शमविली. मात्र, तोपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. खंडाळा येथील पोलीस कर्मचारी स्वप्निल पाटील, मयूर अबनावे, लोणावळा वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार सदाशिव पीरगणवार, दर्शन गुरव, सतिष ओव्हाळ, विशाल दातीर, तुषार घाडगे, नितेश पडवळ यांनी घटनास्थळी जाऊन इतर वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन केले. आग आटोक्यात आणल्यानंतर धिम्म्या गतीने वाहतूक सोडण्यात आली



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply