Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, २ दिवस पाणी पुरवठा बंद; कोणत्या भागांचा समावेश?

Thane City: ठाण्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. ठाण्यामध्ये दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी जपून पाणी पुरवठा करावा असे आवाहन करण्यात आले आहे. जलवाहिनीच्या देखभाल आणि दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ठाण्यातील अनेक भागांमधील पाणी पुरवठा दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे याची नोंद नागरिकांनी घ्यावी आणि पाणी साठवून ठेवून त्याचा जपून वापर करावा.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा आणि वागळे इस्टेट या परिसरातील काही भागामध्ये २६ डिसेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते २७ डिसेंबर शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यत म्हणजे एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीवर कटाई नाका ते मुकुंदपर्यंतच्या जलवाहिनीवर देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

Khambatki Ghat : खंबाटकी घाटामध्ये मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ४ ते ५ किलोमीटरपर्यंत रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल

या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतंर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्रमांक २६ आणि ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या सर्व गोष्टींची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि पाणी साठवून ठेवावे. तसंच पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ठाणे महानगर पालिकेचा वतीने करण्यात आले आहे. पाणी पुरवठा बंद राहणार असल्यामुळे ठाणेकरांना दोन दिवस त्रास सहन करावा लागणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply