Thane Traffic : महाशिवरात्रीनिमित्त ठाण्यातील वाहतुकीत बदल! घराबाहेर पडण्याआधी पाहा कोणते रस्ते बंद, कोणते सुरु?

Thane Traffic : उद्या २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त शिवमंदिरात भाविकांची खूप गर्दी असते. ठाण्यातील ढोकळी मंदिरात नंदीबाबा मित्र मंडळाच्या वतीने महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त कापूरबावडी, ढोकळी, कोलशेत,मनोरमानगर, मानपाडा भागातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात येतात.या परिसरात जत्रेचे आयोजन केले जाते. त्यामुळे अनेक भाविक येथे येत असतात.

ढोकळी येथील मंदिरात खूप भाविक येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूकीत बदल केले आहेत. २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत संध्याकाळी ४ ते १० या कालावधीत वाहतूकीत बदल करण्यात येणार आहे. यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ शकते.

Sambhajinagar Police : छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पोलिस ठाण्यांत सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र डेस्क; जलद तपासासाठी निर्णय

ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरुन नळपाडा मार्गे कोळशेतच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना नळपाडा येथे प्रवेश बंदी असणार आहे. तेथील वाहनांना कापूरबावडी,मानपाडा पुलाखालून वळण घेऊन जावे लागणार आहे.

मानपाडा- माजिवाडा प्रभाग समिती येथून कोलशेत आणि ढोकाळीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. वाहनांना आर मॉल, बाळकुम नाका किंवा दोस्ती वेस्टी काँट्री मार्गे वाहतूक करावी लागणार आहे. कोलशेत येथून कापूरबावडीच्या दिशेने प्रवास करणाऱ्यांना ढोकाळी सिग्नल येथे प्रवेशबंदी असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोढा अमारा, मनोरमानगर, ब्रम्हांड मार्गे जावे लागणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply