Thane News : मध्य रेल्वेत फटका गॅंग पुन्हा सक्रीय? मोबाइल चोरीसाठी तरूणावर हल्ला; धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाने गमावले दोन्ही पाय

Thane News : अलीकडे लोकलमधून प्रवास करताना होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. सध्या तशीच एक घटना पुन्हा ठाण्यातून समोर आली आहे. मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने केलेल्या हल्ल्यात एका युवकाला आपले पाय गमवावे लागले आहे. जगन लक्ष्मण जंगले असं या व्यक्तीचं नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, जगन लक्ष्मण जंगले हे दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल याठिकाणी काम करतात. नेहमीप्रमाणे जगन यांनी २२ मे रोजी कल्याणला जाण्यासाठीलोकल रात्री साडेआठच्या सुमारास दादर स्थानकातून पकडली होती. ठाणे  स्थानक सोडल्यानंतर जगन दरवाजात उभे होते. तेव्हा यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्याच्या हेतुने एका गर्दुल्याने त्यांच्यावर हल्ला केला. जगनच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्यानं फटका मारला.

Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर

त्यामुळे तोल जावून जगन फलाट क्रमांक दोनपासून २०० मीटर पुढे लोकलमधून खाली पडले. त्यावेळी त्यांच्या हातातील मोबाइल देखील गहाळ झाला. या घटनेत जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलचं चाक गेलं. त्यामुळ जगन या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने उचललं. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जगन यांना दाखल करण्यात आलं होतं.

परंतु, त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे तसंच त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रियाकरावी लागणार होती. त्यामुळे त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. त्याठिकाणी त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले. जगन हे घरातील एकमेव आर्थिक आधार आहेत. त्यांच्या घरातील परिस्थिती बिकट असून नुकतंच एका महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, परंतु या घटनेत त्यांनी दोन्ही पाय गमावले आहेत.

असे प्रकार नेहमीच घडत असतात. रेल्वे पोलीस केवळ तपास करत आहोत, अशी माहिती देतात. जर अश्या प्रकारे रेल्वे प्रवाश्यांच्या जिवाशी खेळ होणार असेल, तर यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचं नागरिक म्हणतआहेत. आता याप्रकरणी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु पोलिसांनी याप्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. सध्या त्यांच्यावर ठाण्यात खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply