Thane : ठाण्याच्या खाडीवर उभारला जाणार कोस्टल रोड; आठ महिन्यांत मोठा टप्पा पूर्ण, थेट वाढवण बंदराशी जोडणारा आणि पुढे कर्नाटकपर्यंत जाणारा मार्ग

Thane : मुंबईतील कोस्टल रोडच्या पाठोपाठ ठाण्यातही खाडी किनारा मार्ग उभारणीच्या कामाला गती मिळाली आहे. Thane Coastal Road-1 या प्रकल्पाचं 50 टक्के काम पूर्ण झालं असून काम सुरु होताच 8 महिन्यांतच महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. एमएमआरडीएने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ही माहिती दिली. यावेळी त्यांनी व्हिडीओही शेअर केला. या केस्टल रोडमुळे ठाण्यातील वाहतूक कोंडीची मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

पहिला टप्पा कसा?
ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यात खारेगाव - गायमुखदरम्यान काम सुरु आहे. हा टप्पा 13.45 किमी लांब असून डिसेंबर 2028पर्यंत या मार्गावर वाहतूक सुरु होण्याचे संकेत आहेत. तसेच हा संपूर्ण मार्ग सहा पदरी असून, ठाण्याती वाहतूक कोंडी सोडवण्यात मदत होणार आहे. मुंबईनंतर ठाणे आणि नवी मुंबईतही सागरी किनारा मार्ग बांधण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात गायमुख - खारेगाव मार्ग उभारण्यात येत असून, पुढील टप्प्यात बाळकूम-आनंदनगर मार्ग उभारण्यात येणार आहे. हा मार्ग एकूण 7 किमी लांब असणार आहे. घोडबंदर, भिवंडी मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यात मोठी मदत होणार आहे.

या उन्नत मार्गासाठी पायाभरणीचं काम पूर्ण झालं आहे. ठाणे खाडीदरम्यान पूल उभारून हा मार्ग तयार केला जाणार आहे. गायमुखमध्ये हा मार्ग गायमुख-फाऊंटन हॉटेल भुयारी मार्गाला थेट जोडणार आहे. यामुळे ठाणे-भाईंदर कनेक्टीव्हिटीला चालना मिळणार आहे. या दोन्ही मार्गांमुळे घोडबंदर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कुठे-कुठे जोडणार?
तयार झाल्यावर हा मार्ग वाढवण बंदर, जेएनपीटी, उत्तर महाराष्ट्रासह चक्क कर्नाटकलाही जोडणार आहे. इतकेच नव्हे तर या संपूर्ण कोस्टल रोडमध्ये ठाण्यातील अनेक अन्य प्रकल्पांचाही समावेश केला जाणार आहे. भविष्यात तयार होणारी Thane Ring Metro , ठाणे कोस्टल रोड - 2 ला हा मार्ग थेट जोडणी देणार आहे. तसेच, साकेत-अमाने उन्नत मार्ग, कासरवडवली-खारभाव मार्ग अशा अनेक मार्गांना हा कोस्टल रोड जोडणार आहे. हा मार्ग तयार होताच ठाणे-बाळकुम अंतर केवळ 15 मिनिटांमध्ये पार होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *