Thane Bandh : ठाणे बंदचा नागरिकांना फटका, रिक्षासाठी लांबच लांब रांगा; पोलीस जागोजागी तैनात

Thane Bandh : मराठा आंदोलनकर्त्यांवर जालना येथे झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. ठाणे बंदला जवळपास सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र या बंदचा नागरिकांना फटका बसताना दिसत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.

ठाण्यातील सर्वाच भागात बंदचा परिणाम दिसून येत आहे. ठाण्यातील नेहमी गजबजलेला नौपाडा परिसरातही आज शुकशुकाट दिसत आहे. नौपाड्यातील गोखले रोडवर देखील तुरळक वाहने दिसत आहेत.

Hindu Jangarjana Morcha : धर्मांतरविरोधी जनजागृतीसाठी हिंदू जनगर्जनेचा मोर्चा

कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला ठाणे बंदचा फटका बसताना दिसत आहे. बंदमुळे ठाणे शहरात ऑटोरिक्षा बंद आहेत. ज्या रिक्षा सुरु आहेत त्यासाठी प्रवाशांना तब्बल तास ते दीड तास रांगेत उभं रहावं लागत आहे.

ठाणे बंदची हाक दिल्यानंतरही काही दुकाने उघडी होती. ही सर्व दुकाने कार्यकर्त्यांकडून बंद केली जात आहेत. व्यापाऱ्यांना हात जोडून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला सहकार्य करण्याची विनंती केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply