Thane : ठाण्यात टेंभी नाक्यावर शिवसैनिकांना मारहाण, धारधार शस्त्राने वार केले, घटना CCTV कैद

Shiv Sena Workers Brutally Attacked at Tembhinaka News : ठाणे शहरातील टेंभी नाका परिसरात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. दोन शिवसैनिकांवर किरकोळ वादातून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आफ़्रिन नावाच्या महिलेसह तिच्या तीन सहकाऱ्यांनी सहभाग घेतल्याचा आरोप आहे. प्राप्त माहितीनुसार, टेंभी नाका येथील रस्त्यावर किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. हल्लेखोरांनी शिवसैनिकांवर हाताने तसेच धारदार वस्तूंचा वापर करून गंभीर जखमा केल्या. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठाण्यातील टेंभी नाका या ठिकाणी फक्त किरकोळ वादातून दोन शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ठाण्यातील शिवसेनेचा शिंदे गटाचे माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या कार्यालयासमोर सदरचा हल्ला झाला आहे. संतोष यांच्या समवेत एका सैनिकांवर परिसरात राहणार्‍या आफ्रिन या महिलेने गुंडांना घेऊन सदरचा हल्ला केला आहे. सुधीर कोकाटे यांचा मुलगा विराज कोकाटे याच्यावर नुकताच किरकोळ वादातून खोटा गुन्हा दाखल केला होता. याचा जाब सुधीर कोकाटे यांनी विचारल्या नंतर सुधीर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला आहे. आफ्रिन महिला आणि तिच्या दोन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून लाखो रुपयांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळी ताब्यात

हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने पोलिसांना कळवले. ठाणे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी शिवसैनिकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आफ़्रिन आणि तिच्या तीन सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि हल्लेखोरांचा हेतू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply