Thane : ठाण्यातील कलेक्टरच्या पीए पल्लवी सरोदे यांचा मृत्यू


pallavi sarode Thane News : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी पल्लवी सरोदे (वय ३७ वर्ष) यांचा हरीहरेश्र्वरमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हरीहरेश्र्वर समुद्र किनाऱ्यावर रविवारी दुर्घटना घडली. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील ९ महिलांचा ग्रुप हरिहरेश्वर येथे फिरायला आला होता. सकाळी समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी सर्व महिला उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने पल्लवी सरोदे बुडाल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी त्यांना बाहेर काढून प्रथमोपचार केले, परंतु त्यांना वाचवण्यात यश आले नाही.

ठाणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पल्लवी सरोदे कार्यरत होत्या. ऑफिसमधील मैत्रिणींसोबत हरिहरेश्वर येथे फिरायला आल्या होत्या. नऊ महिलांचा ग्रुप होता. रविवारी सकाळी सर्व महिला समुद्रात उतरल्या. पल्लवी सरोदे या किनाऱ्यावरील दगडावर बसल्या होत्या. त्यावेळी समुद्राची एक लाट आली आणि त्या प्रवाहात सरोदे वाहून गेल्या. स्थानिक बचाव पथकाने आणि नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.

Leopard Attack : जेवण केल्यानंतर हात धुण्यासाठी अंगणात गेली; चिमुकलीवर बिबट्याची झडप, रात्रीची थरारक घटना

पल्लवी सरोदे या ठाणे जिल्हा प्रशासनात २०१२ मध्ये लिपिक या पदावर रुजू झाल्या होत्या. गेल्या वर्षीच त्यांना प्रमोशन मिळाले. त्या सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून कामावर होत्या. त्या सध्या जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणूनही कार्यरत होत्या. पल्लवी सरोदे यांच्या मृत्यूने जिल्हाधिकारी कार्यालयातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सरोदे यांच्या कुटुंबियांना धीर दिला.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply