Thackeray Brothers : महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड! आज दुपारी १२ वाजता मोठी घोषणा; ठाकरे बंधूंची युती नेमकी कुठे आणि कशी होणार?

Mumbai : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरलाय. आज दुपारी 12 वाजता मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. जुलै महिन्यातील मराठी विजय मेळावा आणि त्यानंतर वाढलेल्या भेटीगाठींमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालं होतं. मात्र, ठाकरे बंधू युतीची अधिकृत घोषणा करणार कधी? याची प्रतीक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. अखेर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीचा मुहूर्त जाहीर केला. दोन्ही बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा जरी झाली असली तरी त्याची घोषणा कधी केली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

मनसे अन् शिवसेना हे दोन्ही पक्ष मुंबईसह सहा महापालिकांमध्ये एकत्रित लढणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पुणे या महापालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. आता उर्वरित महापालिकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Pune : नाताळनिमित्त कॅम्प परिसरात मोठे वाहतूक बदल, दोन दिवस महत्त्वाच्या मार्गांवर निर्बंध; पर्यायी मार्ग कोणते?

युतीच्या घोषणेआधी बाळासाहेबांना आभिवादन

आज ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार आहेत. त्याआधी दोन्ही बंधू शिवाजी पार्कात जाणार आहेत. शिवाजी पार्कात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळास अभिवादन करणार आहेत. त्यानंतरच दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *