Telangana Aircraft Crashed: मोठी दुर्घटना! भारतीय वायुसेनेचे ट्रेनर विमान कोसळलं; २ वैमानिकांचा मृत्यू

Telangana Aircraft Crashed ; तेलंगणामधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे प्रशिक्षणादरम्यान ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. मेडक जिल्ह्यात ही घटना घडली. या दुर्घटनेत दोन भारतीय वायुदलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक वैमानिकांध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.

तेलंगणामध्ये  हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले आहे. यामध्ये दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (४, डिसेंबर) सकाळी ८.५५ वाजता हा अपघात झाला. भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. वायुसेनेने सांगितले की, आज सकाळी नियमित प्रशिक्षणादरम्यान PC 7 Mk II विमानाला अपघात झाला. त्यात दोन पायलट होते.

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सायन रुग्णालयाला भेट; रुग्णांची विचारपूस करत दिला दिलासा

दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, यामध्ये कोणत्याही नागरिकाची जीवितहानी झालेली नाही. एअरफोर्स अकादमीत प्रशिक्षणादरम्यान दिंडीगुलमध्ये हा अपघात झाला. मृतांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply