Teachers Recruitment: राज्यात लवकरच ५० हजार शिक्षक भरती होणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची मोठी घोषणा

Teachers Recruitment 2023 : शिक्षक भरतीची वाट पाहत असलेल्या भावी शिक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. पहिला टप्प्यात ३० हजार आणि दुसऱ्या भरतीत २० हजार शिक्षकांची पदे भरली जाणार, असंही ते म्हणाले.

औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याने शिक्षक भरतीचं काम रखडलं होतं, आता हायकोर्टाने त्यांची स्थगिती उठवली आहे, त्यामुळे शिक्षक भरतीचे परिपत्रक (GR) आजच काढण्यात येणार आहे, असं मंत्री दीपक केसकरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ही शिक्षकभरती दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात राज्यात २० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

राज्यात शिक्षण व्यवस्थेचा दर्जा घसरल्यानंतर राज्यातील शिक्षकांची संख्या हे महत्त्वपूर्ण कारण देण्यात आलं होतं. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्यांच्यावर अधिकचा भार येत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती होणं हे महत्वाचं मानलं जात आहे.

Pune ST Bus Accident : कल्याणहून भीमाशंकरला जाणाऱ्या एसटी बसला अपघात, 35 प्रवाशांसह पुलावरुन 20 फूट ओढ्यात कोसळली

राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार आल्यानंतर शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीच्या अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. नवीन शैक्षणिक वर्षात शिक्षक भऱती करण्यात येईल असं देखील मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं होतं.

तसेच आधार वेरिफिकेशनचं काम झाल्यानंतर राज्यात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ताबडतोब भरती करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र, प्रत्यक्षात शिक्षक भरतीसाठी कोणतीही हालचाल होत नसल्याचं चित्र होतं. पण आता करण्यात आलेल्या घोषणेनंतर आता तरी या शिक्षक भरतीला वेग येईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply