Tamil Nadu Fire News : तामिळनाडूत लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग, 8 प्रवाशांचा मृत्यू; तर 20 जण जखमी

Tamil Nadu Fire News : तामिळनाडूच्या मदुराई येथे ट्रेनला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. लखनऊ- रामेश्वर ट्रेनला ही आग लागली असून या घटनेत ८ जण ठार झाले असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे.

तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला. लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. आठही बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागलेल्या डब्यात एकूण ५५ प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.

IAF :भारताच्या ऐतिहासिक लढाऊ विमानाची जागा घेणार नविन फायटर जेट, वायुसेना १०० विमानांची देणार ऑर्डर

दरम्यान पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे ५:१५ वाजता मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांना गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप आहे ज्यामुळे आग लागली दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.

पीटीआय य़ा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत 8 जण ठार, 20 जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे।



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *