आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया आपल्या दुसऱ्या सामन्यात नवख्या नामिबिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे. या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला यूएई टीममध्ये मोठा बदल झाला आहे. आयसीसीने यूएई टीममधील बदली खेळाडूची घोषणा केली आहे. आयसीसीने यूएई टीममध्ये कुणाच्या जागी कुणाला संधी दिलीय? हे जाणून घेऊयात.
यूएई टीममध्ये बदल
यूएई क्रिकेट टीममध्ये मोहम्मद जोहेब याच्या जागी हैदर शाह याचा समावेश करण्यात आहे. आयसीसीच्या तांत्रिक समितीकडून या बदलासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर आयसीसीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. नियमांनुसार, ठराविक मुदतीनंतर वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात बदल करण्यासाठी आयसीसीच्या तांत्रिक समितीची परवानगी घ्यावी लागते. आयसीसीकडून वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासह बदलासाठी ठराविक मुदत दिली जाते. मुदतीनंतर काहीही बदल करण्यासाठी आयसीसीची पूर्वपरवानगी बंधनकारक असते.
यूएई विजयी सुरुवात करण्यात अपयशी
दरम्यान यूएई टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात विजयी सुरुवात करण्यात अपयशी ठरली. यूएईचा डी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. यूएईला आपल्या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. डी ग्रुपमध्ये यूएई आणि न्यूझीलंड व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि कॅनडाचा समावेश आहे. यूएई या मोहिमेतील आपला दुसरा सामना हा कॅनडा विरुद्ध 13 फेब्रुवारीला खेळणार आहे. त्यानंतर यूएईसमोर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे.
यूएईच्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक
विरुद्ध कॅनडा, 13 फेब्रुवारी
विरुद्ध अफगाणिस्तान, 16 फेब्रुवारी
विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 18 फेब्रुवारी
एकाच मैदानात तिन्ही सामने
दरम्यान यूएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीचे उर्वरित तिन्ही सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. हे सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. मोहम्मद वसीम यूएईचं नेतृत्व करणार आहे.
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी यूएईचा सुधारित संघ : मोहम्मद वसीम (कर्णधार), अलीशान शराफू, आर्यांश शर्मा, ध्रुव पराशर, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मयंक कुमार, मोहम्मद अरफान, मोहम्मद फारूक, मोहम्मद जवादुल्लाह, हैदर शाह, रोहिद खान, सोहेब खान आणि सिमरनजीत सिंह.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

