T20 World Cup 2024 : तुफान वादळात स्टेडियमची तुटली स्क्रीन; T20 वर्ल्ड कपपूर्वी 'या' संघांचे सामने रद्द

T20 World Cup 2024 USA vs BAN Warm Up Match : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार 1 जूनपासूनसुरू होत आहे. याआधी सराव सामने खेळवले जात होते. मुख्य स्पर्धेपूर्वी एकूण 16 सराव सामने खेळवले जाणार आहे. जे संघांना त्यांच्या तयारीत मदत करेल.मात्र आता टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात होणारा सराव सामना वादळ आणि खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार दोन्ही टीम हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. मुसळधार पावसामुळे मैदानाचेही नुकसान झाले आहे.

nस्टेडियमचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये वादळामुळे स्टेडियममध्ये लावलेली स्क्रीन तुटलेली दिसत आहे. खराब हवामान आणि पावसामुळे एकही चेंडू टाकता आला नाही. वादळामुळे अखेर ग्रँड प्रेरी स्टेडियमवरील सामना रद्द करावा लागला.बांगलादेश संघाचे व्यवस्थापक रॅबिड इमान यांनी सांगितले की, आजचा बांगलादेश आणि यूएसए यांच्यातील डलास येथील ग्रँड प्रेरी स्टेडियममधील सराव सामना खराब हवामान आणि सुविधांच्या स्थितीमुळे रद्द करण्यात आला आहे.

Virar News : अर्नाळा समुद्रात बोट बुडाली, एकाचा मृत्यू; ११ जणांना वाचवण्यात यश


यूएस संघ प्रथमच टी-20 वर्ल्ड कपच्या कोणत्याही आवृत्तीत खेळताना दिसणार आहे. ती 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपची सह-होस्ट देखील आहे. अमेरिकन संघ काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे. संघाने अलीकडेच बांगलादेशचा तीन सामन्यांच्या T201 मालिकेत 2-1 ने पराभव केला. पूर्ण सदस्य संघाविरुद्ध अमेरिकेचा हा पहिला मालिका विजय होता. अमेरिकेच्या संघात हरमीत सिंग, अली खान आणि कोरी अँडरसन आहेत. या खेळाडूनी बांगलादेशविरुद्ध चांगली कामगिरी केली होती.


अमेरिकेचा संघ 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी गट-1 मध्ये आहे. या गटात अमेरिका व्यतिरिक्त भारत, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा यांचा समावेश आहे. मालिकेतील दारुण पराभवामुळे बांगलादेशवरील दडपण वाढले आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या एका आवृत्तीत त्यांनी कधीही दोनपेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत. ते श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नेपाळ आणि नेदरलँड्ससह ड गटात आहेत.

टीम इंडियाचा सराव सामना कधी होणार?

भारतीय संघ आपला एकमेव सराव सामना 1 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमवर खेळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अमेरिका पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करत आहे. येथे अनेक स्टेडियम नव्याने बांधण्यात आले आहेत. स्टेडियममधील खेळपट्टीही ऑस्ट्रेलियातून आली आहे. ज्याला ड्रॉप इन पिच म्हटले जात आहे. 9 जून रोजी होणान्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply