Ind vs Pak : टीम इंडियाच्या विजयानंतर बदललं पॉइंट टेबलचं गणित, पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर... 'ग्रुप A'मधून कोण होणार क्वालिफाय?

T20 World Cup 2024 Points Table Ind vs Pak : टी-20 वर्ल्ड कपमध्ये 19 वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. टीम इंडियाने हा रोमांचक सामना 6 धावांनी जिंकून पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे.या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय होता, तर पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव होता. या विजयासह टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी पाकिस्तानवर सुपर-8 मधून बाहेर पडण्याचा धोका आहे.

'ग्रुप A'च्या पॉइंट टेबलमध्ये कोण आहे पुढे?

पाकिस्तान संघाने अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही. दोन सामन्यात सलग दोन पराभवानंतर ते चौथ्या स्थानावर आहेत. टीम इंडिया दोन सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या स्थानावर आहे तर यूएसए संघ दुसऱ्या स्थानावर आहे, कॅनडाचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

IND Vs PAK : बुम- बुम बुमराहाच्या गोलंदाजीसमोर 'बाबर सेना' ढेर; पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव


पाकिस्तान वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर ?बाबर आझमच्या पाकिस्तानने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा यजमान अमेरिकेकडून पराभव झाला तर दुसऱ्या सामन्यात भारताने धूळ चारली. 2 सामन्यांत 2 पराभवांसह पाकिस्तान संघ अ गटात चौथ्या स्थानावर आहे.

इथून पाकिस्तानला सुपर-8 मध्ये स्थान मिळवणे खूप कठीण मानले जात आहे. तथापि, जर पाकिस्तान संघाने आपले पुढील दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकले. आणि यूएसएने आपले दोन्ही सामने हारले तर बाबरचा संघ पुढे जाऊ शकतो. पाकिस्तानचे पुढील दोन सामने कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध होणार आहेत.

तर अमेरिकेला अजून भारत आणि आयर्लंड यांच्याशी सामना करायचा आहे आणि जर त्यांनी यापैकी कोणत्याही एका संघाचा पराभव केला. तर ते 6 गुणांसह सुपर-8 मध्ये पोहोचतील आणि पाकिस्तान बाहेर होईल. याच अर्थ असा की अमेरिका आणि भारत 'ग्रुप A'मधून सुपर-8 मध्ये क्वालिफाय करतील.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जे पहिल्या डावापर्यंत खरा ठरला, कारण टीम इंडिया 119 धावांवर ऑलआऊट झाली. यानंतर सामना पाकिस्तानच्या हातात असल्याचे दिसत होते. मात्र टीम इंडियाच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानी फलंदाज अपयशी ठरले. पाकिस्तान संघाला 20 षटकात केवळ 113 धावा करता आल्या आणि टीम इंडियाने 6 धावांनी सामना जिंकला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply