T20 World Cup 2024 : पाकिस्तानचा संघ टीम इंडियावर भारी पडणार? IND vs PAK सामन्याबाबत बोलताना हरभजन सिंग काय म्हणाला?

 

T20 World Cup 2024 : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. येत्या जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्ध २ हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने या सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

हरभजन सिंगच्या मते पाकिस्तानचा संघ भारतीय संघाचं टेन्शन वाढवू शकतो. कारण दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळत नाही. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने येत असतात

पाकिस्तानचा संघ टीम इंडियावर भारी पडणार?
टी -२० क्रिकेटचा रेकॉर्ड पाहिला तर दोन्ही संघ ७ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ६ वेळेस बाजी मारली आहे. हे दोन्ही संघ २०२२ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतही आमने सामने आले होते. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात विराट कोहलीने ८२ धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला होता.

RCB Playoffs Scenario : CSK ला फक्त हरवून चालणार नाही! RCB ला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

हरभजन सिंग म्हणाला की, ' पाकिस्तानविरुद्ध खेळणं नेहमीच आव्हानात्मक असतं. कारण दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध जास्त सामने खेळत नाही. त्यांची कमकुवत बाजू आणि मजबूत पक्ष याबाबत आम्हाला फार काही माहीत नसतं. मात्र भारतीय टीम मॅनेजमेंट त्यांच्या एकूण एक खेळाडूवर लक्ष ठेवून असते.
तसेच तो पुढे म्हणाला की, ' पाकिस्तानचे गोलंदाज मानसिक आणि शारीरिकरित्या स्वतः ला फिट ठेवतात. भारतीय संघ यात गोष्टींवर नक्कीच लक्ष ठेवून असेल. या गोष्टी तेव्हाच समोर येतील जेव्हा दोन्ही संघ मैदानावर आमने सामने येतील. ' हरभजन सिंगचं म्हणणं आहे की, भारतीय संघाला आपल्या खेळाबाबत अधिक जागरूक व्हावं लागेल आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply