T20 World Cup 2022 : विराट कोहलीने मोडले तेंडुलकर आणि लाराचे विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटर

टी-२० विश्वचषक २०२२ मधील दुसरा उपांत्य सामना अॅडलेड येथे परा पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताला १० विकेट्सने धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात भारतीय संघाडून विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावून एक विशेष विश्वविक्रम केला. कोहलीने सध्याच्या टी-२० विश्वचषकात चौथे अर्धशतक झळकावले, त्याने ४० चेंडूत ५० धावा केल्या, ज्यात त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला.

विराट कोहली या स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीने इंगलंडविरुद्ध ४२ धावा करताच, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी करणार विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने या सामन्यात ४० चेंडूचा सामना करताना ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या.

विराट कोहली अॅडलेड ओव्हलवर सर्वाधिक धावा करणारा विदेशी फलंदाज ठरला आहे. या मैदानावर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून ९५७ धावा केल्या आहेत. त्याने अॅडलेडमध्ये कसोटीत ५०९ धावा, एकदिवसीय सामन्यांमध्ये २४४ धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०४ धावा केल्या आहेत. तसेच याबाबतीत विराट कोहलीने अॅडलेड ओव्हलवर ९४० आंतरराष्ट्रीय धावा करणारा वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडला आहे.
 
एकदिवसीय आणि टी-२० विश्वचषकमध्ये नॉकआउट सामन्यात भारतासाठी ३५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीने या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकले असून त्याच्या नावावर ३३९ धावा आहेत. कोहलीने २०१४ टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नाबाद ७२ धावा आणि अंतिम सामन्यात ७७ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, २०१६ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत, त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध उपांत्य फेरीत नाबाद ८९ धावांची खेळी केली होती.
 
ऑस्ट्रेलियात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियात १६ डावांमध्ये कोहलीचे हे नववे टी-२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक होते. याआधी हा विक्रम अॅरॉन फिंचच्या नावावर होता, ज्याने आपल्या देश ऑस्ट्रेलियामध्ये ४३ डावांमध्ये ८ टी-२० आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply