T20 WC 2024: केएल राहुलला संघात का नाही घेतलं? रोहितने सांगितलं कारण

T20 WC 2024 : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकरने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहितला टी -२० वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या संघाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. ज्यात केएल राहुल बाबतच्या प्रश्नाचा देखील समावेश होता. दरम्यान केएल राहुलला संघात का नाही घेतलं? याबाबत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.

अजित आगरकर म्हणाले की, ' संजू सॅमसन मध्यक्रमात शानदार फलंदाजी करतोय. रिषभ पंतही पाचव्या क्रमांकावर चांगली कामगिरी करतोय. तर केएल राहुल आपल्या संघासाठी टॉप ऑर्डरला फलंदाजी करतोय. त्यामुळे तो संघात स्थान मिळवू शकलेला नाही. तो एक शानदार फलंदाज आहे. मात्र तो बॅटिंग ऑर्डरमध्ये फिट बसत नव्हता.'

Raigad News : अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

टी -२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरशीची लढत सुरू होती. यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान मिळवण्यासाठी केएल राहुल, रिषभ पंत, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, इशान किशन आणि जितेश शर्मा यांची नावं आघाडीवर होती. मात्र या संघात रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ ...

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल

राखीव खेळाडू..

शुभमन गिल, रिंकू सि्ंग, खलील अहमद, आवेश खान

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply