T20 WC: सेमीफायनल शर्यतीतून ऑस्ट्रेलिया आऊट! मॅन ऑफ द टूर्नामेंटबाबत माजी क्रिकेटपटूचं भाकीतImage Credit source: Icc X account
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या जेतेपदासाठी एकूण 20 संघ शर्यतीत आहे. प्रत्येक दिवशी होणाऱ्या सामन्यानंतर स्पर्धा पुढे जात आहे. तसेच या स्पर्धेची रंगतही वाढणार आहे. साखळी फेरीचे सामने सुरू असून सुपर 8 फेरीत कोणते संघ जागा मिळवणार याची उत्सुकता आहे. असं असताना या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कोण जागा मिळवेल? याचं भाकीत आता वर्तवण्यात आलं आहे. हे भाकीत कोणी ज्योतिष्याने नाही तर माजी क्रिकेटपटूने वर्तवलं आहे. दक्षिण अफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज वेन पार्नेल याने टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुरूवातीलाच उपांत्य फेरीत कोणते संघ जातील याचं भविष्य कथन केलं आहे. वेन पार्नेल यांचं भाकीत पाहता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे त्याचं कारणही तसंच आहे. त्यांनी उपांत्य फेरीच्या शर्यतीतून ऑस्ट्रेलियाला बाहेर केलं आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा प्रवास सुपर 8 फेरीतच संपुष्टात येईल असं म्हंटलं आहे. मागच्या पर्वातही असंच झालं होतं.
वेन पार्नेल यांनी टी20 वर्ल्डकप 2026 उपांत्य फेरीचे चार संघांची नाव सांगताना सर्वप्रथम भारताला पसंती दिली. भारताचा सध्याचा फॉर्म पाहता हे भाकीत काही चुकीचं आहे असं म्हणता येणार नाही. पण त्यांनी या शर्यतीतून ऑस्ट्रेलियाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना पसंती दिली आहे. त्यामुळे यावेळी ही स्पर्धा रंगतदार होणार यात काही शंका नाही. पण त्यांचं भाकीत खरं ठरतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. सुपर 8 फेरीत तगडे संघ असणार आहे. त्यामुळे जय पराजय वाटतो तितका सोपा नसेल.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव असेल असं त्यांनी सांगितलं. सध्याचा सूर्यकुमार यादवचा फॉर्मच तसा आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर गवसला. त्यानंतर अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात एकट्याने खिंड लढवली होती. त्यामुळे विजय मिळवणं सोपं झालं. तर सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू कोण असेल? याबाबत त्यांनी दोन नावं घेतली. वेस्ट इंडिजचा रोमारिया शेफर्ड आणि भारताचा फिरकीपटू वरूण चक्रवर्ती हे सर्वाधिक विकेट घेतील. पण या दोन नावांपैकी त्यांनी वरूण चक्रवर्तीच्या नावाला पसंती दिली. रोमारियो शेफर्डने पहिल्याच सामन्यात हॅटट्रीक घेतली होती. तसेच पाच विकेट नावावर केल्या आहेत.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


