T20 मध्ये धावांचा पाऊस, तरीही रोहित-विराट BCCI ला नकोसे, निवड समिती देणार मोठा धक्का?

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील टी ट्वेंटी मालिका टीम इंडियाने जिंकली. चालू वर्षातील पहिलीच मालिका भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात जिंकली आहे. या टी ट्वेंटी मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली होती. यासाठी विश्रांतीचे कारण देण्यात आले असले तरी बीसीसीआय रोहित, विराट कोहलीला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

त्यामुळेच श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, T20 फॉरमॅटसाठी बीसीसीआय विराट कोहली आणि रोहित शर्मा व्यतिरिक्त नव्या खेळाडूंचा विचार करत आहे. त्यामुळेच त्यांना भारताच्या T20 संघातून वगळले जाऊ शकते अशी बातमी आहे. महत्वाचे म्हणजे, रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर बीसीसीआयच्या बाजूने अशा गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यात त्याने टी-20 खेळत राहण्याचा उल्लेख केला होता.

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या नव्या निवड समितीची पहिली बैठक होणार आहे, ज्यामध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडला जाणार आहे. या निवड बैठकीत काही मोठे निर्णय होणार आहेत, ज्यामध्ये भारतीय टी-20 संघातील रोहित-विराटचे भवितव्य ठरणार आहे.

याबद्दल बोलताना निवड समितीतील एका अधिकाऱ्याने, "प्रश्न भारतीय क्रिकेटच्या भल्याचा आहे आणि आम्ही त्याचाच विचार करत आहोत. आता रोहित-विराटच्या पलीकडे विचार करण्याची वेळ आली आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच भविष्यात हे लक्षात घेऊन संघ बनवायचा आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय निवडकर्त्यांचाच असेल," असे सुचक वक्तव्य केले आहे.

दरम्यान, रोहित शर्माने तापर्यंत 148 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 31.32 च्या सरासरीने आणि 139.24 च्या स्ट्राइक रेटने 3853 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 4 शतके आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, विराट कोहलीने आतापर्यंत 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 52.73 च्या सरासरीने आणि 137.96 च्या स्ट्राइक रेटने 4008 धावा केल्या आहेत. त्याने 1 शतक आणि 37 अर्धशतके केली आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply