Swargate ST Depot Case : बलात्काराच्या घटनेनंतर एसटी महामंडळाला जाग, स्वारगेट एसटी डेपोमधील भंगारातील बसेस हटवल्या

 

Swargate ST Depot Case : पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी तब्बल ७० तासांनंतर बेड्या ठोकल्या. या घटनेवरून एसटी महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संतापजनक घटनेनंतर आता एसटी महामंडळाला जाग आली आहे. स्वारगेट एसटी डेपोमध्ये भंगारातील बस अखेर हटवण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाकडून स्वारगेट डेपोमध्ये असलेला गुन्हेगारांचा 'अड्डा' उद्ध्वस्त करण्यात आला.

स्वारगेट एसटी डेपोमध्ये ७ वर्षांपासून भंगारात काढलेल्या बसेस अखेर एसटी प्रशासनाकडून हटवण्यात आल्या आहेत. क्रेनच्या सहाय्याने या बस हटविण्यात आल्या असून लवकरच त्यांची विल्हेवाट लावली जाणार आहे. यामुळे स्वारगेट एसटी डेपोतील गुन्हेगारांचा 'अड्डा' काही काळासाठी तरी उध्वस्त झाला. मात्र त्यांचा वावर रोखणे हे एसटी प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे.

Mumbai Weather : मुंबई रात्रीही घामाघूम; मुंबईकरांना बसताहेत दिवसरात्र उष्णतेच्या झळा, कारण काय?

स्वारगेट एसटी डेपोत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर याठिकाणी असणारी अपुरी सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांचे अपुरे संख्याबळ यासारऱ्या समस्या समोर आल्या आहेत. तसेच रात्रीच्या वेळी अंधारात चालणारे गैरप्रकार यावर देखील प्रकाश पडला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींना मज्जाव करणे हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

- सोलापूर, कोल्हापूरला जाणाऱ्या बसगाड्या ज्या ठिकाणी फलाटावर थांबतात त्या भागात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर अधिक असतो.

- विशेषतः रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत त्या ठिकाणी गर्दुले, विक्रेते आणि तृतीयपंथी यांचा वावर जास्त असतो.

- याच ठिकाणी काही गर्दुले नशेचे सेवन करतात. शिवाय प्रवाशांच्या बॅगा, साहित्य, दागिने चोरटे देखील आसपास फिरत असतात.

- असे व्यक्ती सुरक्षारक्षकांना माहित असतात. त्यांच्यावर कारवाई करून त्यांना एसटी डेपोच्या आवारात येण्यास मज्जाव करणे अपेक्षित आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply