Swargate St Bus Depot Case : माझ्या बदनामीला जबाबदार कोण? पीडित तरुणीचा पुणे पोलिसांना सवाल

Swargate St Bus Depot Case : पुण्यातल्या स्वारगेट एसटी डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केल्यापासून त्याच्यासंदर्भात गुन्ह्यांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अशामध्ये पीडीत तरुणीनी पोलिसांनाच माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील पीडितेकडून पोलिसांना विचारपूस करण्यात आली. माझ्या बदनामीला जबाबदार कोण? असा प्रश्न पीडित तरूणीने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना विचारला. पण या प्रश्नावर पोलिस अधिकारी निरूत्तर असल्याचे समोर आले. तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीशी संवाद साधला होता. यावेळी पीडित तरुणीने हा प्रश्न विचारला.

Pune Water Crisis : पुण्यात तीव्र पाणी टंचाई, आक्रमक नागरिक रस्त्यावर उतरले

दरम्यान,स्वारगेट एसटी डेपोमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणामध्ये पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या खोट्या, तसेच असंवेदनशील वक्तव्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी अॅड. असीम सरोदे यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार, जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत, असे नमूद करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी हा अर्ज फेटाळला.

पीडितेच्या अधिकारांचे रक्षण करण्याचे आणि तिचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये रोखण्यासाठी मनाई आदेश देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यात आला आहे, असे पीडितेचे वकील अॅड. असीम सरोदे यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply