Swargate Bus Depot Case : स्वारगेट बस डेपो अत्याचार प्रकरण; आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी

Pune : स्वारगेट बस स्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. गाडेला दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत आहे. आज आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी केली जाणार आहे. आरोपीच्या डीएनए चाचणीसाठी रक्त आणि केस फोरेन्सिक लॅबला पाठवले आहेत.

आरोपीविरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळालेत. बसची केली फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली असून त्यात पोलिसांना पुरावे मिळाले आहेत. ससून रुग्णालयात आरोपीची लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली ती पण पॉजिटिव्ह आली आहे.
सहमतीने संबंध झाल्याचा आरोप?

Ghatkoper Crime : नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं

स्वारगेट बलात्कार प्रकरणी नराधम दत्ता गाडेला अटक केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालंय. दत्ता गाडे आणि पीडित तरुणीमध्ये सहमतीने संबंध झाले मात्र पैशांच्या वादातून हे प्रकरण घडल्याचा दावा नराधम गाडेच्या वकिलांनी केला. तर त्याचीच रीघ ओढत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी धक्कादायक दावा केलाय.

तर वकिलांच्या युक्तीवादानंतर गाडेच्या पत्नीनेही पीडितेवर गंभीर आरोप करत आरोपीची पाठराखण केलीय. नराधम दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दोन दिवसात पोलिसांनी आरोपी गाडेला गुनाट गावातून अटक केली. आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री १ वाजता ताब्यात घेतलं.
गावातील शेतात दत्तात्रय गाडे लपून बसला होता. पोलीस कोठडीत नेल्यानंतर दत्ता गाडेनं माझं चुकलं, मला माफ करा, टाफो फोडत त्यानं चुक कबूल केली. त्याचबरोबर त्याने एक मोठा दावाही केलाय. 'मी अत्याचार केला नाही, सहमतीनं संबंध केले आहे'. असा दावा गाडेनं पोलिसांसमोर केला. दत्तात्रय गाडेनं हा दावा पोलिसांसमोर केला असून या प्रकरणाचा कसून तपास पोलीस करीत आहेत. दत्तात्रय गाडे शिरूरमधील गुनाट गावात दबा धरून बसला होता. त्याच्याशोधासाठी पुणे पोलिसांची १३ पथके तयार करण्यात आली होती. पालकमंत्री अजित पवार यांनीही तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply