Swargate bus depot : स्वारगेटप्रकरणातील मोठी अपडेट! तरूणीने इन कॅमेरा जबाब नोंदवला, पीडितेनं सांगितली सर्व आपबीती

Swargate bus depot : स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर राज्यातील वातावरण तापलं. या प्रकरणात दत्ता गाडेला अटक करण्यात आली आहे. दत्ता गाडेची चौकशी सुरू आहे.

अशातच पीडित तरूणीचाही न्यायालयात जबाब नोंदवण्यात आला आहे. तरूणीनं हा जबाब इन कॅमेरामध्ये नोंदवला आहे. हा जबाब लिफाफा बंद पाकिटात न्यायालयात सादर करण्यात आला असून, तरूणीसोबत २५ फेब्रुवारीला नेमका काय प्रकार घडला? हे तरूणीच्या जबाबात सविस्तर मांडण्यात आलंय.

या प्रकरणात आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांनी नुकताच जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच रूग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली आहे. डेपोच्या आवारात असलेल्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना २५ फेब्रुवारीला घडली होती.

Mumbai Police : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या? कुटुंबाचा आरोप

२६ वर्षीय तरूणीवर दत्ता गाडेनं लैंगिक अत्याचार केला होता. वाहक असल्याची बतावणी करून त्यानं तिला शिवशाही बसमध्ये नेलं. नंतर जबरदस्तीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरुणीवर अत्याचार करून दत्ता गाडे पसार झाला. आरोपीला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री अटक केली.

गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे. पोलिस कोठडीत असलेल्या गाडेचा जबाब शनिवारी पोलिसांकडून नोंदविण्यात आला होता.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply