Swachh Bharat Mission : ‘एक तारीख एक तास’, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वच्छता महिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Swachh Bharat Mission : ‘एक तारीख एक तास’ म्हणत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता अभियान आयोजित केलं होतं. या मोहिमेमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लाखो स्वयंसेवक सहभागी झाले होते. मुंबई महाराष्ट्रासह संपूर्ण भरतभर आयोजित केलेल्या या उपक्रमात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी हातात झाडू घेऊन श्रमदानाचा आनंद लुटला.

या स्वच्छता मोहिमेची माहिती देताना डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक हेमंत कदम म्हणाले की, पदमश्री, महाराष्ट्र भूषण आणि स्वच्छता दूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण देशभरात स्वच्छता अभियान हाती घेण्यात आला आहे. जी नॉर्थ आणि एफ साऊथ या विभागात हा उपक्रम राबवण्यात आला. दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क, चैत्यभूमी, सिद्धिविनायक जी / उत्तर विभाग, कबुतरखाना, शिवसेना भवन ते प्लाझा, लालभाग राजा मेन गेट, कॉटन ग्रीन स्टेशन, ज्ञानेश्वर विद्यालय, महर्षी दयानंद कॉलेज, यासह इतर अनेक ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला.

Pune Crime : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने त्याच्या खून; प्रेयसीसह पाच जणांना अटक

या मोहिमेची अधिक माहिती देताना स्वयंसेवक महेश नाईक म्हणाले की, पदमश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारने स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे २०१४ पासून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्वच्छतेचा उपक्रम वर्षेतून ३ ते ४ वेळा हाती घेतात. आज देखील सकाळी सात वाजल्यापासून स्वयंसेवक मोठया उत्साहाने सहभागी झाले होते. 

ते म्हणाले, या आधी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर, पाट-बंधारे, नद्या-नाले, तलाव, विहिर यांची देखील स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच अनंत चतुर्थीला गिरगाव आणि जुहू चौपाटीला निर्माल्यापासून खत निर्मितीचा उपक्रम राबवण्यात आला. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून हा विशेष उपक्रम गेल्या पाच-सहा वर्ष पासून आम्ही पार पडत आहोत. आज स्वच्छता अभियानाला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

याच मोहिमे अंतर्गत मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील स्वच्च्छता अभियानात अभिनेत्री वंदना गुप्ते देखील सहभागी झाल्या होत्या. आपण आपले घर जस स्वच्छ ठेवतो, तसं आपण आपलं अंगण देखील स्वच्छ ठेवले पाहिजे. मुंबई शहरातील प्रत्येक नागरिकांनी आज प्रतिज्ञा केली पाहिजे की, आपल्या घरा समोरचा रस्ता देखील तेवढाच स्वच्छ ठेवला पाहिजे. महानगर पालिका आपल्यापरीने काम करत असतेच पण मुंबईतील लोकसंख्या इतकी वाढली आहे की ते देखील किती करणार? आणि ते आपल्याला कचऱ्याची पेटी देतील पण त्यात कचरा टाकणार कोण? तर तो आपण टाकायचा आहे. आपलं घरासमोरच आंगण आपण झाडलं पाहिजे. आपली स्वतःची देखील ती जबाबदारी आहे



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply