Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी'ने राज्य सरकारला दिली आठवड्याची मुदत, सळो की पळो करून सोडण्याचा प्रशांत डिक्करांचा इशारा

Swabhimani Shetkari Sanghatana : अतिवृष्टीची मदत मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेकडो शेतकऱ्यांसह बुलढाणा संग्रामपूर तहसिल कार्यालयावर आक्रोश काढला. या माेर्चाचे नेतृत्व स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर  यांनी केले. 

मागील काळात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही तसेच आता पाच दिवस अवकाळी पाऊस झाला. त्याचे अद्याप पंचनामे झालेले नाहीत. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सरकारच्या या निष्काळजीपणाचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  जाहीर निषेध करीत संग्रामपूर तहसील कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह आक्रोश करीत ठिय्या आंदोलन केले.

Peb Fort News : मुंबईची IT इंजिनीअर तरुणी पेब किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत कोसळली, ७ तास चाललं रेस्क्यू ऑपरेशन

अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीवरील शेतकऱ्यांना कर्ज माफ करा, 100 टक्के पीक विमा व कापूस सोयाबीनचे भाव वाढीवर केंद्र सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी या व अन्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या.

दरम्यान या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा पुढील आठवड्यात राज्य सरकारला सळो की पळो करून सोडणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply