आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ ; सुषमा अंधारेंवरील आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी तक्रार दाखल

Political News : आमदार संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यावरून सुषमा अंधारे आणि अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगामध्ये शिरसाट यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. २६ मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर शहरात आयोजित एका बैठकीमध्ये संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या बाबतीत अतिशय अर्वाच्य भाषेत आणि खालच्या पातळीवरती जाऊन स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले होते. त्याबाबतीत सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान,छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील शिरसाट यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये सुषमा अंधारे यांच्याबद्दल स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दाचा वापर करणाऱ्या आमदार शिरसाट यांच्यावर कलम ३५४ (अ), ५०९, ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी यांनी केली आहे. हा तक्रार अर्ज क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाकडे दिला आहे. आता पोलीस याबाबत तपास करून पुढील कारवाई करणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

काय म्हणाले होते संजय शिरसाट?

संजय शिरसाट म्हणाले की, अंबादास दानवे यांनी मला फोन केला. म्हणे ती बाई (सुषमा अंधारे) डोक्याच्या वर झाली आहे. संजय शिरसाट यांची सुषमा अंधारेंवर टीका करताना जीभही घसरली. ती बाई सर्वांना म्हणते हे माझे भाऊ आहेत. सत्तार माझे भाऊ, भुमरे माझे भाऊ, काय काय लफडे केले तिने काय माहित, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply