Supriya Sule : 'कुछ रिश्ते दिल से बनते हैं'; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर निशाणा

 

Supriya Sule : राजकारण हा भातुकलीचा खेळ नसतो. यात नाती नसतात, जबाबदारी असते. काम आणि नाती वेगवेगळ्या जागेवर असतात. मी माझं काम जबाबदारीने करत असते. रक्ताची नसली तरी प्रेमाची नाती खूप आहेत. विश्वासाची नाती असतात. नाती माझ्यासाठी राहतीलच, पण वैचारिक लढा सुरु आहे. एका व्यक्तीविरोधात ही लढाई नाही. तर भाजपच्या विचाराविरोधात माझी लढाई आहे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाले आहेत. 

संसद ही भाषण करण्यासाठीच असते. आमच्यासाठी ही इमारत नसून विचाराचे मंदिर आहे. मोदी निवडून आले तेव्हा ते संसदेच्या इमारतीवर नतमस्तक झाले. या लोकशाहीच्या मंदिरात चर्चा करण्यासाठीच लोकांनी आम्हाला पाठवलं आहे. ज्या संसदेत ऐतिहासिक घटना घडल्या त्या याच संसदेत घडल्या. सर्व प्रस्ताव येथेनच मंजूर होतात, असं म्हणत सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

Maratha Andolan : मराठा आंदोलक तिसऱ्या दिवशीही आक्रमक; अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन, एसटीसेवा बंद, नागरिकांचा खोळंबा

आदरणीय पंतप्रधान मोदी यांचे फोटो देशातील शाळा-कॉलेजमध्ये लावण्यात आले आहेत. सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा जीआर काढण्यात आला आहे. मोदीच सेल्फी काढण्यासाठी प्रोत्साहन करत असतात, असं म्हणत त्यांनी टीका केली.देशात लोकशाही आहे, दडपशाही नाही त्यामुळे चर्चा झालीच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

अजित पवारांवर निशाणा

कुछ रिश्ते दिल से बनते हैं,माझे अनेकांसोबत विश्वासाचे नाते आहे. त्यामुळे भावनिक आव्हानाला काही अर्थ नाही. आमचं सगळं कुटुंब राजकारणात नाहीय. आमच्या कुटुंबाला तुम्ही राजकारणात कशाला आणता? दादा बोलले असतील तर तुम्ही त्यांनाच विचार,असं म्हणत त्यांनी उत्तर देणे टाळले. तसेच समोर कोणताही उमेदवार असला तरी मी प्रामाणिकपणे लढेन, असं सुळे म्हणाल्या.

ज्या माणसाने पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने चिन्ह हिस्कावून घेतलं. अदृश्य शक्तीने संविधानाची चिरफाड केलीय. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. संस्थापकीय अध्यक्ष शरद पवार आहेत त्यामुळे पक्ष त्यांनाच मिळायला हवा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. धनगर समाजाला आरक्षण देऊ असं फडणवीस बारामती मध्ये येऊन बोलले होते. मनोज पाटील यांचे आंदोलन उभ्या राज्याने पाहिलं आहे, असं त्या म्हणाल्या.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply