Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला दिलासा; मतदानाची आकडेवारी ४८ तासात जाहीर करण्याचे आदेश देण्यास नकार

Supreme Court : 'मतदान झाल्यानंतर ४८ तासांच्या आत मतांच्या टक्केवारीचे आकडे तत्काळ जाहीर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्या,' अशी मागणी करत सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने सध्या याबाबत निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मतदानानंतर 48 तासांच्या आत निवडणूक आयोगाने तात्काळ मतांच्या टक्केवारीचे आकडे जाहीर करावेत, अशी मागणी एका याचिकेतून करण्यात आली होती. तसे आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला द्यावेत, असे या याचिकेमध्ये नमूद करण्यात आले होते. या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत मतदानाच्या आकडेवारी संदर्भात निवडणूक आयोगाला कोणतेही आदेश देण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे.

Naxalites Encounter : छत्तीसगडमध्ये ७ नक्षलवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एस सी शर्मा यांच्या पिठासमोर ही सुनावणी पार पडली. ज्यामध्ये "या प्रकरणावर सध्या सुनावणी योग्य नाही. देशभरात सध्या निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे याबाबत सध्या निवडणूक आयोगाला कोणताही आदेश देता येणार नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले. तसेच ही मागणी आम्ही फेटाळून लावत नाही, यावर उन्हाळी सुट्टीनंतर सुनावणी होईल," असे कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात उत्तर दाखल केले असून बूथनिहाय आकडेवारी जाहीर करण्यास विरोध केला होता. बूथनिहाय आकडेवारी जाहीर केली तर मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण होईल असे उत्तर निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केले आहे.

सर्व मतदानझाल्यानंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीचा फोटो मोर्फ करून व्हायरल केला जाऊ शकतो, त्यामुळं कायद्यानुसार झालेल्या मतदानाची माहिती (फॉर्म 17 सी) ची माहिती फक्त पोलिंग एजट यांनाच देता येईल असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply