SRH vs MI : हार्दिक पांड्याची संथ खेळी पडली महागात... ठरला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण

Sunrisers Hyderabad win by 31 runs vs Mumbai Indians : मुंबई इंडियन्स बुधवारी सपशेल अपयशी ठरले. सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांवर आक्रमण करताना आयपीएलमधील एका डावातील सर्वाधिक २७७ धावसंख्या उभारली.

धावांचा पाठलाग करताना मुंबईने विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण त्यांना पाच बाद २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. अखेर ३१ धावांनी पराभव झाला. दोन्ही डावांत मिळून विक्रमी ५२३ धावसंख्या उभारण्यात आली. या लढतीत सर्वाधिक ३८ षटकार मारले गेले. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. हैदराबादने पहिल्या विजयाला गवसणी घातली.

हैदराबादकडून मुंबईसमोर २७८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. रोहित शर्मा व इशान किशन या जोडीने ५६ धावांची भागीदारी करताना आश्‍वासक सुरुवात केली; पण दहा धावांच्या अंतरात दोघेही बाद झाल्यामुळे मुंबईचा पाय खोलात गेला. शाहबाद अहमद याने इशानला ३४ धावांवर, तर पॅट कमिन्सने रोहितला २६ धावांवर बाद केले.

त्यानंतर नमन धिर व तिलक वर्मा या जोडीने ८४ धावांची भागीदारी करताना मुंबईच्या विजयाची आशा कायम ठेवली. जयदेव उनाडकटने नमन याला ३० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवत हैदराबादसाठी मोठी कामगिरी केली. त्यानंतर ३४ चेंडूंमध्ये ६४ धावा करणारा तिलक कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने १८८.२३ च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि सहा षटकार मारले.

Kota Student: कोटामध्ये चाललंय काय? NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; तीन महिन्यांमध्ये 8 प्रकरणं समोर

कर्णधाराची फ्लॉप कामगिरी

त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार हार्दिक पांड्याला काही विशेष दाखवता आले नाही. त्याला २० चेंडूत केवळ २४ धावा करता आल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १२० होता. मुंबईचा जो पण खेळाडू मैदानात येते होता, त्याचा स्ट्राइक रेट चांगला होता. पण कर्णधार हार्दिक पांड्याची संथ खेळी महागात पडली. त्याच्या या खेळल्यामुळे मुंबईचा पराभव झाला का असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या सामन्यात टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड अनुक्रमे 42 आणि 15 धावा करून नाबाद राहिले. हैदराबादकडून कर्णधार कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी शाहबाज अहमदला यश मिळाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply