Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; वडिलांची आठवण काढत म्हणाल्या…

Sunita Williams : नासामधील भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकावरून (आयएसएस) व्हिडीओ संदेश जारी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा हा व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओत त्यांनी त्यांच्या वडिलांची आठवणही काढली. तसेच त्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांचे आभारही मानले. सुनीता विल्यम्स या दीर्घकाळापासून अंतराळात अडकल्या आहेत.

व्हिडीओ संदेशात नेमकं काय म्हणाल्या सुनीता विल्यम्स?

अंतराळ स्थानकावरून मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. यंदा मला पृथ्वीपासून २६० मैल दूर अंतराळात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली आहे. माझ्या वडिलांनी आम्हाला दिवाळी आणि इतर सण साजरे करण्यास तसेच आपली सांस्कृतिक मुल्ये जपण्यास शिकवलं. दिवाळी हा आनंदाचा क्षण आहे, असे त्या म्हणाल्या.

Pune : समाविष्ट गावांतील मतदार ‘निर्णायक’



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *