Sunil Kedar News : काँग्रेस नेते सुनिल केदार यांना मोठा धक्का, नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी दोषी

Sunil Kedar News : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रस नेते आणि राज्याचे माजी मंत्री सुनिल केदार यांना कोर्टाने सर्वात मोठा धक्का दिला आहे. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात न्यायालयाने सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. केदार यांच्यासह एकूण सहा जणांना या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. यामधील तिघांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

सुनील केदार यांना मोठा धक्का...

बहुचर्चित नागपूर जिल्हा सहकारी बँकेतील १५० कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा निकाल आज (शुक्रवार, २२ डिसेंबर) सत्र न्यायालयात लागणार आहे. या प्रकरणात कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सत्र न्यायायलाच्या अतिरिक्त न्यायाधीश जे व्ही पेखळे- पुरकर यांनी हा निकाल दिला.

Gadchiroli News : नक्षलवाद्यांचा भारत बंद; छत्तीसगडमध्ये दोन प्रवासी बस पेटवल्या

या प्रकरणात सुनील केदार यांच्यासह अशोक चौधरी, केतन सेठी, अमोल वर्मा, सुबोध भंडारी आणि नंदकिशोर त्रिवेदी या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर महेंद्र अग्रवाल, ओमप्रकाश पोतदार, सुरेश पेशकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply